Type Here to Get Search Results !

चुकीच्या ठिकाणी लावलेले अरुंद बरिकेटचे स्थलांतर;नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी केला पाठपुरावा; सनसिटी ते प्रयेजा सिटी दरम्यानची वाहतूक कोंडी टळणार


पुणे प्रतिनिधी: सनसिटी व प्रयेजा सिटी दरम्यान पुलाखाली लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड हे अरुंद असल्याने एकाच वेळी दोन वाहने जाऊ शकत नव्हती, तसेच ते चुकीच्या ठिकाणी लावल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप होत होता. 
स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी लोखंडी बॅरिकेट स्थलांतर करण्याबाबत महापालिकेकडे  पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. 
मंगळवारी महापालिकेच्या पथ विभागाकडून ते बॅरिकेट काढण्यात आले असून त्या बॅरिकेट ची जागा बदलून तसेच त्याची लांबी वाढवून नवीन ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 
सप्टेंबरमध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे सनसिटी व प्रयेजा सिटी या दोन्हीला जोडणारा रस्ता वाहून गेला होता. त्यानंतर पालिकेच्या पथ विभागाकडून या रस्त्याचे काम युद्धपातळीवर करून पूर्ण करण्यात होते. सुरुवातीला या रस्त्यावरून सर्व वाहनांना प्रवेश होता, परंतु बंदिस्त काम झाल्यानंतर पुलाच्या मजबुतीकरणचे कारण देत अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्यासाठी हे बॅरिकेट बसविण्यात आले होते.