"त्या' तरुणाच्या कोरोना व स्वाईन फ्लू अहवाल "निगेटिव्ह' ; जनतेने घाबरू नये. | C24TAAS |
नेवासा - चीनमधून नुकत्याच परतलेल्या आणि शुक्रवारी 7 फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या सुपे ता. पारनेर एमआयडीसीतील कामगाराच्या रक्ताच्या व घशातील द्रवाच्या नमुने घेतले होते. ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. तो अहवाल रविवारी 9 फेब्रुवारी ल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. अहवाल येताच डॉक्टरांसह अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्या तरूणाच्या प्रकृतीत सुधारणा झाली अाहे. त्याला लवकरच सुटी दिली जाणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. सी चौवीस तास.
नेवासा तालुक्यातील हा 25 वर्षीय तरुण 15 दिवसांपूर्वीच चीनमधून परतला. खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने श्रीरामपूरमध्ये उपचार घेतले. शुक्रवारी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला रविवारी सकाळी प्राप्त झाला. अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. सी चौवीस तास
नेवासा तालुक्यातील "त्या' तरुणाच्या कोरोना व स्वाईन फ्लू आदी तपासण्या करण्यात आल्या. त्या सर्व तपासण्यांचे अहवाल "निगेटिव्ह' आले आहेत. सी चौवीस तास
"त्या' तरुणाचा अहवाल "निगेटिव्ह' आला आहे. जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्व परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा रुग्णालय सज्ज आहे. आरोग्याबाबत नागरिकांनी कुठल्याही गोष्टीची खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करू नयेत.
- डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय