Type Here to Get Search Results !

नेवासा - प्रशासनाची मोहिनीराज यात्रा उत्सवाकडे डोळेझाक ; अद्याप नियोजन बैठक नाही. | C24TAAS |


नेवासा - प्रशासनाची मोहिनीराज यात्रा उत्सवाकडे डोळेझाक ; अद्याप नियोजन बैठक नाही. | C24TAAS |


मोहिनीराज देवस्थान समिती,पोलीस प्रशासन, नगरपंचायत प्रशासन, महसूल प्रशासनाचे यात्रा उत्सवाकडे दुर्लक्ष, ५ दिवसावर यात्रा उत्सव असून अद्याप प्रशासनाच्यावतीने कुठलीही नियोजन बैठक नाही...



नेवासा - महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेली येथील नेवासा ग्रामदैवत श्री.मोहिनीराज महाराज यात्रा उत्सवास प्रारंभ झाला असतांना प्रशासन मात्र या यात्रा उत्सवाकडे डोळेझाक करत असल्याने यात्रा उत्सव दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
ग्रामदैवत मोहिनीराज यात्रेच्या अनुषंगाने अद्याप नियोजन बैठक होणे गरजेचे असतांना देवस्थान समिती,पोलीस प्रशासन, नगरपंचायत प्रशासन, महसूल प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

दरवर्षी प्रमाणे मागील वर्षी ही यात्रा उत्सवात रहाट पाळणे व लहान मुलांसाठी आलेल्या मनोरंजन खेळाच्या ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे वाद झाले मात्र त्याकडे ना देवस्थान समितीने लक्ष देते ना पोलीस प्रशासन हे असे कायमच सुरू असल्याने दिवसेंदिवस यात्रा उत्सव कमी होत आहे. मागील काळात कलावंतांना मारहाण झाल्याने लोकनाट्य तमाशे ही येणे बंद झाले आहे.तसेच मोहिनीराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर नुकत्याच भूमिगत गटारींचे काम झाल्याने रस्त्याला मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले असून ठिकठिकाणी दगडं व मातीचे ढिगार पडलेले असून नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
या वर्षी यात्रा उत्सव वाढण्यासाठी शहरातील सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाने यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घ्यावी तसेच शांतता कमिटी व ग्रामस्थांची तातडीने बैठक घेणे गरजेचे असून यात्रा उत्सवात धिंगाणा घालणाऱ्या टारगटांचा बंदोबस्त करावा.


शंकर नाबदे, नेवासा. मो.9960313029