नेवासा - हातावरचे पोट असणाऱ्या कष्टकरी लोकांना किराणा वस्तूंचे वाटप. | C24TAAS |
नेवासा - कोरोना या विषाणूंच्या भयाण रोगाने जगात थैमान घातले असल्याने हातावरचे पोट असणाऱ्यांची फारच उपासमार होत आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता नेवासा येथे हातावरचे पोट असणाऱ्या सुमारे वीस कष्टकरी लोकांना किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. पुणे येथील दानशूर व वारकरी संप्रदायातील निस्सीम सेवेकरी रविंद्र मुनोत यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य सैनिक पन्नालाल मुनोत यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात आला.
नेवासा येथील मळगंगा देवी मंदिराजवळ असलेल्या जेष्ठ व्यापारी व पत्रकार विजय गांधी यांच्या किराणा दुकानामध्ये हातावरचे पोट अवलंबून असणाऱ्या गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी जेष्ठ व्यापारी मोहनलाल मुनोत,पत्रकार विजय गांधी,व्यापारी सूर्यकांत गांधी,राजेंद्र मुथ्था,जयंत देवचक्के,पत्रकार सुधीर चव्हाण, पत्रकार शंकर नाबदे,नगरसेवक राजेंद्र मापारी, अभिजित गांधी,सागर गांधी,ओम गांधी यांच्या हस्ते गरजूंना किराणा वस्तूंच्या वाटप पाच फुटावर सर्वांना उभे करून करण्यात आले होते.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आपल्या परिसरात गावात होऊ नये म्हणून देशासह आज महाराष्ट्र बंद आहे या लॉक डाऊनच्या परिस्थितीत हातावरचे पोट असणाऱ्यांचे फारच हाल होत होते त्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे.
ज्यांची परिस्थिती चांगली ते घरात बसून आपल्या कुटुंबात वेळ घालतांना दिसत आहे मात्र त्यांनी घरातील किराणा पिठमिठ सर्व पध्दतीने चांगली तयारी केली आहे. मनोरंजनात आपला वेळ घालवत असतांना ज्यांना रोज कष्ट केले तरच रात्रीची चूल पेटते अशा कष्टकरी लोकांची संख्या ही भरपूर आहे.सारे भारतीय माझे बांधव आहे या ब्रीद वाक्याप्रमाणे आपण ही समाजाचे देणे लागतो या भावनेने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे यावेळी जेष्ठ पत्रकार विजय गांधी यांनी सांगितले.
हातावरचे पोट असणाऱ्या कष्टकरी लोकांसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अशा उपक्रमाना पाठबळ द्यावे सढळ हाताने मदत करावी व आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी असे उपक्रम राबवून गरजूंना या कठीण परिस्थितीत मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.