Type Here to Get Search Results !

नेवासा - "लॉक डाऊन" मुळे गावाकडे पायी चाललेल्या महिलेची ATM मध्ये प्रसूती. | C24Taas |

नेवासा - "लॉक डाऊन" मुळे गावाकडे पायी चाललेल्या महिलेची ATM मध्ये प्रसूती. | C24Taas |

Video :👇


नेवासा - कोरेगाव भीमा वाघोली येथे मोलमजुरी करणारे एक कुटुंब लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथे पायी जात असताना त्यातील एका गर्भवती महिलेला नेवासा तालुक्यात नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे गर्भवती महिलेला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. या अवघडल्या महिलेला तिच्या कुटुंबीयांनी बडोदा बँकेच्या एटीएम मध्ये आडोशाला नेले. यावेळी याठिकाणापासून जवळच असलेल्या वडाळा बहिरोबा येथील कामगार तलाठी श्रीकांत भाकड आणि त्यांचे सहकारी निलेश मोटे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी वडाळा आरोग्य उपकेंद्रातील परिचारिका न्यालपेल्ली व काळे यांना बोलावून घेतले. त्यांनी या महिलेची सुखरूप सुटका केली. आणि त्या महिलेने बँक ऑफ बडोदा च्या एटीएम मध्ये गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी घटनास्थळापासून जवळच राहणाऱ्या लताबाई ओनावळे या महिलेने याकामी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोलाची मदत केली. घ

माहिती कामगार तलाठी भाकड यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिली. तहसीलदारांनी तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांना सोबत घेऊन वडाळा बहिरोबा येथे धाव घेतली. यावेळी लॉक डाऊन बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस कॉन्स्टेबल सुनील आव्हाड, विकास बोर्डे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. प्रशासनाने या महिलेस व नवजात बालकास पुढील उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. बाळ व बाळंतीण दोन्हीही सुखरूप असल्याचे समजते. यावेळी उपसरपंच राहुल मोटे तसेच निलेश मोटे, सचिन बहादूरे, अभिजित पतंगे, गणेश फाटके, सागर बहादूरे, जयवंत मोटे या युवकांनी या महिलेबरोबरच तिच्या कुटुंबियांना व प्रशासनाला लॉक डाऊनचे संकेत पाळत मोलाची मदत केली.