Type Here to Get Search Results !

नगरमधील दोन कोरोना बाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह, आतापर्यंत २० जणांना डिस्चार्ज

नगरमधील दोन कोरोना बाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह, आतापर्यंत २० जणांना डिस्चार्ज


अहमदनगर: अहमदनगरमधील दोन कोरोना बाधित असलेल्या रुग्णांचा १४ दिवसानंतरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुळे लोणी आणि अहमदनगर शहरातील मुकुंदनगर येथील दोघां बाधीतांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल ३१ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने अहमदनगर जिल्हा हा हॉटस्पॉट जिल्हा म्हणून घोषीत करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्याला हॉटस्पॉट घोषीत करण्यात आल्यानंतर कोरोना सारख्या आजाराच संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळले त्या भागाला १४ दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन केले होते. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा ही बंद करण्यात आल्या होत्या मात्र आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने अलगीकरन कक्षात ठेवलेल्या तब्बल २० कोरोना बाधीतांचा १४ दिवसानंतरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुळे आतापर्यंत ३१ रुग्णांपैकी २० जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये ११ मार्च रोजी दुबईहून आलेल्या एका डॉक्टराला या संसर्गजन्य आजाराची लागणं झाली होती. त्यानंतर बाधीताचा आकडा वाढत तब्बल ३१ पर्यंत पोहचला. त्यामध्ये ६ पॉझिटिव्ह हे दिल्लीमधील मरकजच्या कार्यक्रमातुन आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेले जिल्ह्यातील २० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते तर इतर ५ असे एकूण ३१ बाधितांची संख्या झाली होती.
मात्र डॉक्टर, नर्सेस, पोलीस आणि यांना मार्गदर्शन करणारे जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या विरोधात चालू केलेल्या लढाईला सर्व अहमदनगरकरांनी सहकार्य केले. यामुळे आज ३१ वरुन बाधीतांची संख्या ११ वर आली असून २० जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.