नेवासा - कापड दुकानाला आग ; अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील भक्ती कलेक्शन या कापड दुकानाला आग लागुन अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा माहिती मिळाली. मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील घोडेगाव येथील नगर-औरंगाबाद महामार्गावरील मार्केट कमिटी जवळ असलेल्या भक्ती कलेक्शन कापड दुकान लाँकडाऊन असल्याने दुकान बंद होते. गुरुवारी सकाळी दुकानात आग लागली असल्याचे लक्षात आल्याने बाजूच्या लोकांच्या मदतीने पाणी टाकून ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने आजुबाजूच्या दुकानांना याची कुठल्याही प्रकारची हानी पोहचली नाही. आगीमध्ये अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तुकाराम जरे यांनी सांगितले आहे.
नेवासा तालुक्यातील बातम्यांसाठी WhatsApp group जॉईन करा 👉https://chat.whatsapp.com/EXYTrNII5WG6vceCJ1zAJd