Type Here to Get Search Results !

नगर जिल्ह्यात आज २८ कोरोना रुग्ण आढळले. | C24Taas |

नगर जिल्ह्यात आज शुक्रवारी २८ कोरोना रुग्ण आढळले.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे आज दि.२६ जुन शुक्रवारी २८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. त्यात २४ रुग्ण नगर शहरातील आहे.
आज दि.२६ जुन शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयाकडून आलेल्या अहवालात २८ जण पॉझिटिव्ह आढळले. यात नगर शहरातील नालेगाव,वाघगल्ली ४,सिव्हील हडको परिसरात २,तोफखाना परिसरात १२,सिद्धार्थनगर परिसरात ६ रुग्ण आढळले.
 तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे १, कर्जतमध्ये २, शिर्डी यथील १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. जिल्ह्यात सध्या अ‍ॅक्टिव रूग्णांची संख्या १०५ आहे.तर २६५ जण बरे होऊन घरी गेले परतले आहे, अशी माहिती नोडल अधिकारी बापूसाहेब गाडे यांनी दिली.