Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्ह्यात ८ नवे रुग्ण. तर बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला एक हजारांचा टप्पा.

अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला एक हजारांचा टप्पा. तर जिल्ह्यात आज सकाळी आढळले ८ नवे रुग्ण ; ७५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह.

अहमदनगर - जिल्ह्यात आज १९ जुलै, २०२० दुपारी १२-३० वाजता १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ८ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि श्रीगोंदा तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे.
आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एक रुग्ण तर श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव ०१, कोळगाव ०१, अजनुज ०१, देवदैठण ०१ आणि घारगाव येथील ०३ रुग्णांचा समावेश आहे.
आज सकाळी ७५ रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
 आज बाधित आढळलेल्या रुग्णासह उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५१६ इतकी झाली आहे.

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)