Type Here to Get Search Results !

अहमदनगर गावठी कट्टा विक्रीकरीता बाळगणा-या आरोपीस अटक



श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील बस स्टँड जवळ एक जण  हा देशी बनावटीचा कटटा (अग्नीशस्त्र) विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
गोवींद रामनाथ पुणे वय-३२ रा.म्हस्की रोड गलांडे वस्ती,वैजापुर जि.औरंगाबाद  असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.हा व्यक्तीने गावठी कट्टा विक्रीसाठी आणला होता .त्याची  
पंचासमक्ष   झडती घेता त्याचे ताब्यातील  ३०,००० रु किंमतीचा एक देशी बनावटीचा
गावठी कटटा, व ५०००/- रु किंमतीचा मोबाईल, असा एकुण ३५,०००/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
त्याचेकडे सदर गावठी कटटा कोठून  आणला तसेच परवान्याबाबत विचारले याबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आरोपी यास जप्त मुद्देमालासह अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
         ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह,अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी  राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

प्रतिनिधी गणेश राठोड अहमदनगर