नेवासा तालुक्यात आज शनिवारी 39 रुग्णांची वाढ. | C24TAAS |
नेवासा येथील कोविड केअर सेंटरला आज शनिवारस 19 सप्टेंबर रोजी 128 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 17 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 020 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 02 असे तालुक्यातील 39 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
तसेच 04 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
असे तालुक्यातील 39 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1530 झाली आहे. तर आज रोजी 376 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 37 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याने 1128 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 26 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇




