Type Here to Get Search Results !

बीडमध्ये आरक्षणासाठी मराठा विद्यार्थ्यांचे बलिदान.

बीडमध्ये आरक्षणासाठी मराठा विद्यार्थ्यांचे बलिदान


बीड (प्रतिनिधी)
औसरमल गौतम
नन्नवरे कृष्णा:
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून निराश झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवेक कल्याण रहाडे असं या तरुणाचे नाव असून या १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बीड तालुक्यातील केतूरा गावातील तो रहिवासी होता. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने १५ दिवसांपूर्वी नीटची परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने आज दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकस्मिक मृत्यूची नोंद बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.

विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असून मृत्युपूर्वी त्याने तशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. “मी एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा वैद्यकीयला नंबर लागणार नाही. खासगी महाविद्यालयांत वैद्यकीय शिक्षण घेण्याची माझी ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे, त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. माझ्या मृत्यूनंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्याच्या मुलाची किव येईल आणि माझे मरण सार्थकी लागेल” असे विवेकने त्या कथित चिट्ठीत लिहिल्याचे सांगितले जात आहे.