नेवासा तालुक्यात बुधवारी 17 रुग्ण आढळले.| C24Taas |
आजपर्यंत तालुक्यात 2484 रुग्ण आढळले तर 2368 रुग्ण बरे होऊन ते घरी परतले आहे.

नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटर आज बुधवार 11 नोव्हेंबर रोजी 121 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 08 व्यक्ती तर खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 07 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 02 व्यक्ती असे 17 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
- देवगाव - 02
- गेवराई - 01
- घोडेगाव - 04
- लोहारवाडी - 01
- नेवासा खुर्द - 05
- पानसवाडी - 01
- सोनई - 01
- वाकडी - 01
- वाटापुर - 01
असे तालुक्यातील 17 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.
आज दुपारी 4 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2484 झाली आहे. तर आज रोजी 77 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 27 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2368 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात आजपर्यंत 39 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇






