अहमदनगर - प्रशांत गडाखांच्या पत्नी गौरी गडाख यांनी केली आत्महत्या! | C24Taas |
Shankar Nabadeनोव्हेंबर ०७, २०२०
अहमदनगर - प्रशांत गडाखांच्या पत्नी गौरी गडाख यांनी केली आत्महत्या!
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी सौ. गौरी प्रशांत गडाख यांचा राहत्या घरात मृतदेह आढळला आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीवरून गौरी गडाख यांनी आत्महत्या केली असल्याचे समजले.
आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलं नाही.नगर शहरातील यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर, रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇