नेवासा - गौरीताई प्रशांत गडाख यांच्या अंत्यविधीनंतर आज सोमवार 9 नोव्हेंबर रोजी नेवासा तालुक्यातील सोनई येथे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी गडाख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले .
श्री नार्वेकर सह जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी कै.गौरी प्रशांत गडाख यांच्या निधनानंतर आज हेलिकॉप्टरने सोनई येथील जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी भेट देवून मंत्री गडाख, प्रशांत गडाख यांचे सांत्वन केले. यावेळी उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, नगरचे आमदार संग्राम जगताप, आदर्शगाव हिवरेबाजारचे पोपटराव पवार उपस्थित होते.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇