Type Here to Get Search Results !

गुड न्यूज : नेवासा तालुक्यात 2020 या वर्षाच्या शेवटी 53 व्यक्तींच्या तपासणीत कोरोनाचा बाय-बाय... | C24Taas |

 गुड न्यूज : नेवासा तालुक्यात 2020 या वर्षाच्या शेवटी 53 व्यक्तींच्या तपासणीत कोरोनाचा बाय-बाय... | C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध.

आजपर्यंत तालुक्यात 2924 रुग्ण आढळले तर 2853 रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

नेवासा तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून दररोज अनेक रुग्ण आढळत होते मात्र गेल्या काही दिवसापासून  तालुक्यात रुग्ण आढळण्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असताना आज तालुक्यात 53 व्यक्तींनी कोरोना रॅपिड अँटीजन तपासणी केेली. आणि या   तपासणीचा अहवाल नेवासा तालुक्यासाठी 2020 वर्षाच्या अखेरच्या दिवशी पूर्णपणे दिलासादायक मिळाला आहे... त्यामुळे 2020 या वर्षाच्या शेवटी कोरोनाचा बाय-बाय...

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2924 झाली आहे. तर आज रोजी 17 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 02 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2853 व्यक्ती आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 18 डिसेंबर पर्यंत 54 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇