नेवासा - श्रीस्वामी समर्थ अध्यात्मिक मार्गाच्या वतीने करजगाव येथे कृषी प्रदर्शन उत्साहात संपन्न. | C24Taas |
नेवासा तालुक्यात करजगाव सह,उस्थळ दुमला,बेलपांढरी व आंतरवली या गावात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.महोत्सवात बालसंस्कार,साहित्य, गर्भसंस्कार,विज्ञान,जनकल्याण योजना,कृषी मार्गदर्शन बरोबरच स्वामी समर्थ मार्गातील अठरा विभागाची सविस्तर माहिती देण्यात आली.ऑनलाईन वधू-वर परिचय मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.

कृषी शास्रज्ञ डाॅ.अशोक ढगे,माजी कृषी उपसंचालक संभाजी गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते डाॅ.करणसींग घुले व पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे यांनी महोत्सव कार्यक्रमात उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.पंच कमेटी व सेवेकरी मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कृषी महोत्सवात घरगुती खते तयार करण्याचे प्रशिक्षण शेतक-यांना देण्यात आले. शेतीपुरक जोडधंदा,देशी गायीचे संवर्धन, पशुपालन, स्वयंरोजगार व सण उत्सव कसे साजरे करावे याबाबत माहिती देण्यात आली. स्वामी समर्थ पंचकमेटीसह तालुक्यातील सर्व केंद्र व साप्ताहिक केंद्रातील सेवेकरी व भक्तांनी महोत्सव यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


