आंबेगाव तालुक्यातील बँका, पतसंस्था कर्मचाऱ्यांना कोरोना लस द्या - सागर काजळे यांची मागणी
प्रतिनिधी : अमोल जाधव
आंबेगाव तालुक्यातील बँका व सहकारी संस्था, पतसंस्था, तसेच सार्वजनिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधक लसीकरण तात्काळ करण्यात यावे अशी मागणी भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे यांनी केली असून या बाबतचे निवेदन त्यांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिले आहे.
गेले वर्षभर करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिकांना यात प्राण गमवावे लागले आहेत. सध्या करोना लसीकरण सर्वत्र सुरू आहे. सुरुवातीला मंचर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केले जात होते. आता प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरू झाले आहे. वैद्यकीय कर्मचारी, त्यानंतर पोलीस, साठ वर्षापुढील नागरिक यांना लस दिली जात आहे. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या प्रयत्नामुळे पोलीस पाटील यांनाही लस दिली जात आहे. मात्र ज्यांचा दररोज सर्वसामान्य नागरिकांशी संबंध येतो, असे बँका व पतसंस्थेचे कर्मचारी यांना अद्याप करोना लसी पासून वंचित आहे. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करोना लस देणे गरजेचे आहे. या संदर्भात शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे सागर काजळे मागणी केली आहे.
