Type Here to Get Search Results !

संगमनेर तालुक्यात भूकंप सदृश्य धक्का...!

 संगमनेर तालुक्यात भूकंप सदृश्य धक्का...!

बोटा / माळवाडी /कुरकुटवाडी परिसरात घबराटीचे वातावरण


संगमनेर ( शाविद्द शेख ) - संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या बोटा, घारगाव, आंबी-दुमाला, कुरकुटवाडी, म्हसवंडी, अकलापूर, माळवाडी सह आदी पंचक्रोशी मध्ये आज गुरुवार दिनांक २५ मार्च रोजी दुपारी साडे चार वजेच्या सुमारास २.६ रिशटर स्केल इतका भूकंप सदृश्य धक्का बसला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. 

याबाबत नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले आहे. दरम्यान यापूर्वी अनेकदा बोटा माळवाडी कुरकुटवाडी आधी परिसरात अशा प्रकारचे भूकंप सदृश्य धक्के बसलेले आहेत या परिसरात नेहमीच अशाप्रकारचे धक्के बसत असल्याने नागरिक खूप वेळ देत असतात आज पुन्हा एकदा हा धक्का बसल्यानेकाहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.