Type Here to Get Search Results !

बीयर बाॅक्स घेवून चाललेला कंटेनर घोडेगाव येथे रस्ता दुभाजकावर आदळून पलटी. | C24Taas |

 

बीयर बाॅक्स घेवून चाललेला कंटेनर घोडेगाव येथे रस्ता दुभाजकावर आदळून पलटी. | C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


नेवासा तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव येथे शनिचौकात बीयर बाॅक्स घेवून चाललेला कंटेनर एम.एच.२६ ए.डी.७६४२ चा अपघात होवून रस्ता दुभाजकावर पलटी झाला. सोनई पोलिसांच्या सतर्कतेने ४० लाख रुपयाच्या २ हजार बाॅक्सची लुटमार टळली.
औरंगाबाद जवळील वाळुंज औद्योगिक वसाहत मधून टुबर्ग कंपनीचे २ हजार बीयरचे बाॅक्स घेवून कोल्हापूरला भरधाव वेगात चालला होता. समोर ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर पलटी झालेला दिसल्यानंतर जोरात ब्रेक मारल्यानंतर कंटेनर रस्ता दुभाजकावर आदळून पलटी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री १२:३० वाजता झाला.
कंटेनर पलटी होवून अंदाजे ४० लाख रुपये किंमतीचे २ हजार बीयर बाॅक्स विखुरले होते. रात्रीच्या गस्तीवर असलेले सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात काही वेळात अपघाताच्या ठिकाणी पोचले. मालमत्तेची लुटमार होण्याची शक्यता लक्षात घेवून त्यांनी हवालदार रविंद्र लबडे सह होमगार्डचा बंदोबस्त ठेवला. रात्री उशिरा सर्व बीयरचे बाॅक्स बदली वाहनातून हलविण्यात आले.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇