Type Here to Get Search Results !

माजी मंत्री एकनाथ खडसेंचा शनिदेवाला अभिषेक.| C24Taas |


माजी मंत्री एकनाथ खडसेंचा शनिदेवाला अभिषेक.| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


राज्याचे माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी काल शुक्रवारी सकाळी ११ वा. ( दि.२६ रोजी) शनिशिंगणापूर येथे येऊन शनिमस्तक झाले.
खडसे यांना आपण आमदार होऊन मंत्रिमंडळात स्थान राहावे,असे म्हणताच त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना शनिदेव सदबुद्दी देवो,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केल्यानंतर प्रथमच शनिदर्शनासाठी आले होते. 
त्यांनी शनीदेवाला विधिवत पूजा करून शनीदेवाला तेल वाहुन , शनिमस्तक होऊन शनिदर्शन घेतले.यावेळी कोणतेच तालुक्यातील, जिल्ह्यातील पुढारी,कार्यकर्ते उपस्थित नव्हते,खडसे यांचा खाजगी दौरा होता, परिसरातील जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या संकल्पना तुन वृक्षारोपण व विकासात पडलेली भर ते त्यांच्या वाहनातून चित्र पाहत पाहत त्यांनी आनंद घेऊन प्रशंशा केली.शिर्डी येथून साईदर्शन घेऊन सकाळी ११ वाजता शनिशिंगणापूर येथे दाखल झाले.यावेळी देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बानकर तर ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच बाळासाहेब बानकर,पोलीस पाटील ऍड. सायरांम बानकर यांनी सन्मान केला. खडसे यांचे शनीदेवांच्या पावनभूमीत आगमन झाले तेव्हा त्यांचे स्वागत पो. नि.सचिन बागुल यांनी केले.

खडसे दर्शन घेऊन जात असताना त्यांच्या वाहनजवळ ऍड.सायराम बानकर निरोप देताना म्हणाले की तुम्ही लवकर आमदार होऊन मंत्री म्हणून झाल्यानंतर मोठा कार्यक्रम शनिदरबारी घेऊ असे सूचक विधानावर, खडसे म्हणाले राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना आमदार करण्यासाठी त्यांना सद्बुद्धी देवो,असे खडसे म्हणाले.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇