सलाबतपुर येथून 25 किलो गो मांस पकडले.| C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
नेवासा पोलिसांनी तालुक्यातील सलाबतपुर येथून 25 किलो गोमांस पकडले.
याबाबद पोकाँ किरन शिवाजी काटे वय 29 वर्ष नेम नेवासा पोलीस स्टेशन यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी प्रवरासंगम दुरक्षेत्र येथे पोहेकाँ श्री.साळवे यांना मदतनीस म्हणुन काम करतो.
आज दिनांक 08/04/2021 रोजी 45 वा नियत्रन कक्ष अहमदनगर येथुन संदेश प्राप्त झाला की इसम नामे शहानवाज मोहम्मद शेख रा. सलाबतपुर, ता.नेवासा येथे त्याचे राहते घरी गोवंश जातीचे जनावराचे मास विक्रीसाठी आनले आहे अशी माहीती प्राप्त झाली त्यानंतर मी , सपोनि विजय ठाकुर व चापोकॉ कु-हाडे असे शासकीय वाहणाने स्टेशन डायरी नोंद क्र 11 वेळ 13.03 वा रवाना होवुन 14.30 वा पोहचल्यावर वर नमुद इसम यांचे घरी जावुन घरासमोर मोकळ्या जागेत एक पातेले मीळुन आले.
त्याची पाहणी केली असता त्यात साधारण 20 ते 25 किलो मास मीळुन आले. तेथील हजर ईसम यांच्याकडे विचारपुर केली असता त्याने सदरचे मास हे गोवंश जातीचे जनावरांचे असल्याचे सांगीतले. म्हणुन सपोनि ठाकुर यांनी लागलीच दोन पंचांना बोलावून घेतले. त्यांना सदरची हकीगत समजावुन सांगुन पंचनामा करुन देण्यास सांगीतले पंचानी सहमती दर्शवील्याने सदरचे मास पंचासमक्ष पुढील कारवाई करीता ताब्यात घेवुन जप्त करण्यात आले.

25 किलो गोवंश जातीचे मांस प्रती 200 रु किलो अदांजे रुपये 5,000 किमंतीचे गोवंश जातीचे जनावराचे मास हे गोवंश जनावारीची कत्तल करुन विक्री करण्याचे उद्देशाने आरोपी नामे शहानवाज मोहम्मद शेख रा. सलाबतपुर ता नेवासा सदर कथित गोवंश जातीचे गोमांसचा पंचा संमक्ष सपोनि ठाकुर यांनी सविस्तर पंचनामा करुन जप्त केले आहे.सदरचे कथित गोमांस व आरोपीसह पोलीस स्टेशनला आणले आहे तरी
दिनांक 08/04/2021 रोजी दुपारी 14.30 वा चे सु इसम नामे शहानवाज मोहम्मद शेख रा सलाबतपुर ता नेवासा याने 25 किलो किलो कथित गोवांश जातीचे गोमांस विनापरवाना बेकायदा विक्री करतांना मिळुन आला म्हणुन माझी त्याचे विरुध्द भादवी कलम 429 सह महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5 , 5 ( क ) , 9 ( अ ) , 9 ( ब ) , 11 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे गुरनं II 234/2021 भादवी क 429 सह महा पशु सं . का .1995 चे सुधा . 2015 चे क .5 , 5 ( क ) , 9 ( अ ) , ( ब ) , 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ के आर साळवे करीत आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇





