Type Here to Get Search Results !

पाबळ - शिक्रापूर पोलिसांची फुटणवाडी येथे जुगार अड्डयावर छापा ; 15 जणांवर कारवाई, 17.85 लाख रुपये जप्त.

शिक्रापूर पोलिसांची पाबळ फुटणवाडी मधील जुगार अड्डयावर छापा. 15 जणांवर कारवाई तर रोख रक्कमेसह 17.85 लाखाचा माल जप्त शिक्रापूर पोलिसांची पाबळ मधील सर्वात मोठी कारवाई.

पाबळ प्रतिनिधी (सुनिल पिंगळे ) कोव्हीड-19 या रोगाचे प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी  यांचे संचारबंदीचे आदेश जिल्हयामध्ये लागू असतानाही तसेच आपल्यामुळे कोव्हीड -19 चा प्रसार होवू शकतो याची जाणीव असतानाही विना मास्क स्वतःचे फायदयाकरीता सर्वांना एकत्र जमून तीन पानी जूगार खेळणाऱ्या 15 जणांवर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत 17 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असुन याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक किरण कारभारी भालेकर यांनी फिर्याद दिली आहे.

      याबाबत शिक्रापूर ठाण्यातुन त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार दि.23 मे रोजी दुपारी 12.30 वाजण्याचे दरम्यान पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर यांना मिळलेले गोपीनिय माहितीनुसार ,पाबळ ता.शिरूर येथील फुटणवाडी वस्तीमध्ये शेतातील पक्क्या खोलीत तीन पत्ती नावाचा जुगार भरवून काही इसम खेळत आहे तर गावातील इसम नामे युवराज सुदाम बगाटे,  प्रवीण सुदाम बगाटे व  सुदाम हरिशेठ बगाटे हे संगनमताने जुगाराचा आडडा चालवत आहे. वरील माहीती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक किरण भालेराव यांनी वरिष्ट पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना याबाबत माहिती दिली.आणि तात्काळ दोन पंचाना बोलावून मिळालेल्या बातमीचा आशय समजावून सांगितला.

सदर रेड करणे कामी पंचानी पंच म्हणून हजर राहण्यास सहमती दर्शविल्यांनतर  पेालीस स्टाफ व पंच खासगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून 12.30  मिनिटांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता इसम नामे युवराज सुदाम बगाटे, सुदाम हरिशेठ बगाटे यांनी संबंधित ठिकाणाहुन पलायन केले . त्यावेळी सदर ठिकाणी  पंचासमक्ष पाहीले असता खालील इसम हे तीन पत्ती नावाचा जूगार कोव्हीड-19 या रोगाचे प्रसार रोखण्यासाठी मा.जिल्हाधिकारी पुणे याचे संचार बंदीचे आदेश असतानाही विना मास्क एकत्रित येऊन  जूगार खेळताना मिळून आले. 

ते इसम खालीलप्रमाणे  पवन किसन वाळुंज (रा. फाकटे ता. शिरूर), नवनाथ नामदेव घोलप (रा. गोसासी ता. खेड), अतुल लक्ष्मण कानडे (रा. कानेरसर ता. खेड),  विजय शिंदे (रा अवसरी ता आंबेगाव), योगेश निचित (रा वाडनेर, शिरूर), संतोष गाडेकर (रा अवसरी आंबेगाव), सचिन चौधरी (रा एकतानागर खेड), संभाजी बांगर (वाकळवाडी, खेड), अमोल खेडकर (धामारी, शिरूर), अनिल पवार (कनेरसर खेड), संतोष हजारे, संदीप शिंदे (रा अवसरी बु आंबेगाव), सोमनाथ चासकर (रा चाकण, खेड), प्रवीण बगाटे (रा. फुटाणवाडी शिरूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोव्हीड-19 या रोगाचे प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे संचार बंदीचे आदेश लागू असतानाही तसेच आपल्या मूळे कोव्हीड -19 चा प्रसार होवू शकतो याची जाणीव असतानाही विना मास्क स्वतःचे फायदयाकरीता एकत्र जमून तीन पानी जूगार खेळताना मिळून आल्याने वरील इसमांचे विरोधात महाराष्ट्र जूगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4,5 भा द वि कलम 297 अन्वये शासनातर्फे कायदेशीर फिर्याद आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण भालेराव,पोलिस हवालदार बनकर, पोलिस हवालदार मोरे, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान शिक्रापूरच्या पोलीस निरीक्षकाकडून खुपच गोपनीयता पाळण्यात आली असेल्याची माहिती मिळाली आहे तर कर्मचाऱ्यांना देखील कारवाई दरम्यान मोबाईल बंद ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.तर संबंधित इसाम यांना नोटीस बजावुन जामीन करुन सोडले असल्याची माहिती मिळता असुन संबंधित ठिकाणी असलेले पोलिस चौकी यांनी अशा कारवाई करणं आवश्यक असताना कारवाई का केली नाही हे आश्चर्य व्यक्त केले जातं आहे तर यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगार, जुगार साहित्य, रोख रक्कम, वाहने असा सर्व मिळून तब्बल १७ लाख ८५ हजार ६७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॕ. अभिनव देशमुख यांच्या आदेशाने दौंड उपविभाग विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर चे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या पथकाने केली आहे.