Type Here to Get Search Results !

पाबळ येथील व्हिजन फौंडेशनचे महत्वपूर्ण निर्णय ; 20 km पर्यंत मोफत रग्णवाहिका सेवा देणारा. - अध्यक्ष प्रविण चौधरी

पाबळ येथील व्हिजन फौंडेशनचे महत्वपूर्ण निर्णय ; 20 km पर्यंत मोफत रग्णवाहिका सेवा देणारा. - अध्यक्ष प्रविण चौधरी

पाबळ प्रतिनिधी (सुनिल पिंगळे) कोरोनाची दुसरी लाट सध्या कुठे तरी कमी होणाचा चिन्हे दिसत असताना नव्याने तिसऱ्या लाटेची चाहूल लागत असल्याची माहिती मिळत आहे पाहिल्या व दुसऱ्या लाट आल्यामुळे राज्यात सध्या हाहा:कार उडाला असताना महाराष्ट्रात हजारो रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेड्स, औषधी कमी पडत असताना अनेकजण मदतीसाठी सरसावत आहेत. अनेकजण सढळ हाताने सरकारला पर्यायाने जिल्हा, तालुका, गावालाही मदत करत आहेत. मदतीच्या या महाज्ञात अग्रक्रमाने  सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर कुणी बजवत असेल तर ती आहे ग्रामीण भागातील "जीवनवाहिनी" म्हणजे "रग्णवाहिका"

संग्रहित फोटो

 सध्या शिरूर तालुक्यातील पाबळ याठिकाणी तरुण युवा कार्यकर्ते आणि गाव सहभागातून व्हिजन फौंडेशन  कोअर कमिटीच्या माध्यमातून रग्णवाहिका पाबळमध्ये शिवजयंतीच्या मुहूर्तावर दाखल झाली आहे आणि विशेष म्हणजे या रग्णवाहिकेच्या माध्यमातून पाबळ आणि पाबळ परिसरातील अनेक गरजु आणि गरीब लोंकाचे जीव वाचले आहे  तर कोरोना महामारी काळात हि रग्णवाहिका पाबळकरासाठी "जीवनदायिनी" ठरली आहे, गेले चार महिने चालेले सेवा पहात आतापर्यंत 50 ते 55 रग्णाला यांचा फायदा झाला असुन या दरम्यानता व्हिजन फौंडेशनचे रग्णवाहिका व्यवस्थापन करणारे माजी सरपंच अमोल जाधव यांच्या ध्यानात काही गोष्टी आल्या सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य गरीब लोंकाचे  संसार उध्वस्त झालेले असुन हाती काम तर नाही पण पैसा ही नाही अशी परिस्थिती असताना कोरोनाने त्याच्यावर घाला घातला आणि ही संसार व्यवस्थित पुरती कोलमडून गेले अशा वेळी दवाखान्यात जायचं तर रग्णवाहिका पासुन ते दवाखान्यापर्यंत पैशाची नितांत गरज आहे अशावेळी सगळेच पाठ फिरवतात म्हणून हि बाबी, खंत अमोल जाधव यांच्या लक्षात आले आणि ही समस्या त्यांनी फौंडेशनचे अध्यक्ष प्रविण चौधरी व उपध्यक्ष अविनाश न-हे यांच्यासमोर मांडला  तर नुकताच व्हिजन फौंडेशन कोअर कमिटीची बैठक झाली या बैठक दरम्यानात एक  महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला व्हिजन फौंडेशनचे अध्यक्ष प्रविण चौधरी व उपध्यक्ष अविनाश न-हे व सर्व व्हिजन फौंडेशन कोअर कमिटीचे सदस्य यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला "कोरोनाच्या महामारीच्या पाश्र्वभूमीवर पाबळ आणि परिसरातील ज्या कुटुंबाची ना नफा ना तोटा तत्वावर ठरलेली रग्णवाहिकेची रक्कम सुद्धा देण्याची परिस्थिती नसेल, 

अशा  गरीब होतकरू कुटुंबातील रुग्णांना व्हिजन फाऊंडेशनची रुग्णवाहिका 20km पर्यंत मोफत सेवा देणार असल्याची माहिती अध्यक्ष अविनाश चौधरी व माजी सरपंच अमोल जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली यामुळे आता सर्वसामान्य जनतेला एक आधार म्हणून "व्हिजन फौंडेशनचा" मिळतो आहे आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हि भावना लक्षात घेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हाती घेतलेले कार्य सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नक्कीच मोलाचे आहे. यातुन समाजप्रति असलेले नवीन ओळख या व्हिजन फौंडेशनच्या माध्यमातून मिळत आहे तसेच रुग्णवाहिकेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक मदत करणाऱ्या प्रत्येक घटकाचे पाबळमधील तमाम जनतेकडून ऋण व्यक्त केले जातं असुन पाबळमधुन या उपक्रमाचे कौतुक केले जातं आहे तसेच पाबळ केंदुर पंचायत समिती गटाच्या पंचायत समिती सदस्या सौ.सविताताई प्रमोद प-हाड यांनी या निर्णयांचे स्वागत केले असुन व्हिजन फौंडेशनचे सर्व सदस्य यांचे आभार मानले आहे तर व्हिजन फौंडेशन जी सेवा उपलब्ध करून देणार आहे ती नक्कीच स्तुतीसं पात्र आहे मी माझ्या पंचायत समिती गटाच्या वतीने सर्व कार्यकर्तेचं ऋण व्यक्त करते अशी प्रतिक्रिया यावेळी आमचे प्रतिनिधी सुनिल पिंगळे यांच्याशी बोलताना पंचायत समिती सदस्या सविताताई प-हाड यांनी व्यक्त केली...