चुकीच्या धोरणांमुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणापासुन वंचित.- खिलारी
( विनोद गायकवाड ) पारनेर - टाकळी ढोकेश्वर सरकार व शासकीय अधिकारी कोरोना लसीकरणासाठी रोज नवीन धोरण जाहीर करीत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणापासुन वंचित राहावे लागत आहे त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता टाकळी ढोकेश्वरचे मा.सरपंच शिवाजीराव खिलारी यांनी व्यक्त केली आहे.टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचे
लसीकरण सुरू असून नुकताच लसीकरणापुर्वी रॅपिड चाचणी करण्याची सक्ती करणारे शासकीय पातळीवर परीपत्रक काढण्यात आले. या निर्णयाला जनतेमधुन
विरोध करण्यात आल्याने दुसऱ्याच दिवशी ते परीपत्रक मागे घेऊन ज्यांना लक्षणे आढळतील केवळ त्यांचीच चाचणी करण्यात यावी असे परीपत्रक काढण्यात आले. चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील जनतेत चुकीचे संदेश गेल्याने नागरिक लसीकरणापासुन दुर आहेत.मागील काही दिवसांपासून लसीकरण करण्यासाठी
ऑनलाईन बुकिंग करणे अनिवार्य केले आहे. ग्रामीण भागात मोबाईल इंटरनेट
व्यवस्थित चालत नसल्याने बुकिंग करता येत नाही त्याचा फायदा घेत शहरातील
लोक मोठ्या संख्येने ग्रामीण भागात येऊन लस घेत आहेत. तर ग्रामीण भागातील जनतेसाठी लसीकरण केवळ मृगजळ ठरले आहे.सरकारने ग्रामीण रूग्णालये ,प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्वरीत पहिल्यासारखे स्पॉट बुकिंग करून सर्वसामान्य लोकांसाठी लसीकरण उपलब्ध करून द्यावे तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक छोट्या गावात लसीकरण कँम्प आयोजित करावेत तसेच मोठ्या गावात वार्डरचनेनुसार लसीकरण करावे जेणेकरून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होईल.