अखेर पाबळ ग्रामिण रुग्नालयातील आँक्सीजन बेड सुरू होणार..
भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनास यश.
प्रतिनिधी (सुनिल पिंगळे) पाबळ सन्माननीय जिल्हाधिकारी पुणे व सन्माननीय तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या शब्दानुसार व लेखी अर्जनुसार पाबळ येथील ग्रामिण रुग्नालयातील आँक्सीजन बेड सुरू होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष संजय पांचगे यांनी दिली
दिनांक १२ मे २०२१ रोजी भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, शिरुर तालुका भाजपा ओबीसी अध्यक्ष बापुराव ताठे , संदीप साकोरे, यांनी पाबळ कोविड सेंटरला अचानक दिलेले भेटीमध्ये . पाबळ ग्रामिण रुग्नालयातील ४० आक्सीजन बेड बंद असल्याची भयानक वस्तुस्थिती समोर आली होती. या वस्तुस्थितीचा मागोवा घेताला असतं शासकीय उदासीनता आणि स्थानिक राजकारणाला बळी पडलेले हे कोविड सेंटर ही सत्य परिस्थिती बाहेर आली व या परिसरातील नागरिकांना ची होणारी हेळसांड पहात भाजपाच्या वतीने उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानंतर सोशल मीडियावर संजय पांचगे याच्यावर झालेले धमकीवजा तक्रारी आणि आणखी खोल परंतु सखोल माहिती घेण्याच्या उद्देशाने १४ मे रोजी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, आंबेगाव भाजपा अध्यक्ष ताराचंद कराळे, माजी भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष भगवानराव शेळके, कामगार आघाडी पूणे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, बेट भाजपा अध्यक्ष सतीश पाचंगे, शिरुर तालुका युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रोहित खैरे, भाजप सरपंच आघाडी अध्यक्ष रवींद्र दोरगे, भाजपचे हर्षल जाधव, संदीप साकोरे, बापुराव ताठे भाजपा ओबीसी अध्यक्ष, विठ्ठलराव वाघ, विशाल खरपुडे, अजित साकोरे यांनी पाबळ कोविड सेंटरला भेट दिली त्यावेळी कोविड सेंटरामधील उपयुक्तताता व त्याठिकाणी कमतरता हे लक्षात घेता दिनांक १८ मे २०२१ रोजी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, व पदीअधिकारी यांनी मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन पाबळ ग्रामिण रुग्नालयातील आँक्सीजन बेड सुरू करण्याबाबत चर्चा केली या चर्चेचे फलित म्हणून सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बरोबर चर्चा करून डॉक्टर व नियमित स्टाफ ची नेमणूक करण्याबाबत आश्वासन दिले होते.तसेच शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी सन्माननीय डॉ मोरे साहेब यांनीही १५ दिवसात पाबळ ग्रामिण रुग्नालयातील आँक्सीजन बेड सुरू करण्यात येईल असे लेखी पत्र देवुन उपोषण मागे घेण्यासंदर्भात मा.जिल्हा अधिकारी यांनी वेळ मागुन घेतला होता.
त्यानुसार आज दिंनाक 26 मे 2021 रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ५० आँक्सीजन सिलेंडराची उपलब्धता करून देण्यात आली असुन २० आँक्सीजन सिलेंडर पाबळ ग्रामिण रुग्नालयात लगेच पोहच झाले असुन ३० आँक्सीजन सिलेंडर तहसीलदार कार्यालयात आले असुन ते पोहचविण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिले आहे तसेच २ एमबीएस जादा डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगितले.दिलेल्या पत्रानुसार वेळेत आँक्सीजन बेड सुरू करण्यात येतील अशीही माहिती त्यांनी दिली यामुळे शिरुर तालुक्यातील व लगतच्या आंबेगाव तालुक्यातील नागरिकांना आॅक्सीजन बेड उपलब्ध होणार असुन आर्थिक नुकसान, धावपळ ही वाचणार आहे असे असेल तरी या कोविड सेंटराच्या राजकीय वांदगामध्ये आणि शासकीय उदासीनतेच्या पाश्र्वभूमीवर पाबळमधील काही कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागलेला आहे हेही सत्य नाकारता येण्यासारखं नाही पैशाच्या नुकसान बरोबर माणसंही मात्र हाती आली नाही तेव्हा अशा घटनांची दहकता लक्षात घेता पाबळमधील राजकीय कुरघोडी थांबणं व लोकाहितीसाठी पक्षीय राजकारण बाजुला ठेवुन मानवतेच्या नातेने मदत करणं एकत्र येणं आवश्यक आहे अन्यथा हि वेळ आणि हे राजकीय स्टंटबाजी सर्व सामान्य जनता लक्षात ठेवल्याशिवाय राहणार नाही यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी व पोलीस प्रशासन तसेच ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे तसेच सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार. जिल्हा अध्यक्ष संजय पांचगे यांनी व्यक्त केले आहे तर अजुनही या ठिकाणी असलेले सोई व सुविधाची कमतरता दुर होत नाही तोपर्यंत लोकाशाही मार्गाने आंदोलन चालु राहणार असल्याची माहिती संजय शिवाजी पाचंगे जिल्हाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण यांनी दिली आहे..


