कुकाणा व शिरसगावच्या आरोग्य केंद्रात टेस्टींग किट व लस उपलब्ध करून द्या - जिल्हा परिषद सदस्य डॉ. तेजश्री लंघे यांची मागणी.. | C24Taas |
शंकर नाबदे : नेवासा तालुक्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुकाणा व शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात टेस्टिंग किट व लस लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. तेजश्री लंघे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, नेवासा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये कोविड १९ चा कहर सुरू आहे. शिरसगाव व कुकाणा परिसरात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेकजणांचे बळी गेले आहेत.
कुकाणा व शिरसगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात टेस्टिंग किटची कमरतता भासत आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर तपासणे तसेच उपचार सुरू करण्यास अडचणी येत असून संक्रमित रुग्णांमुळे संसर्ग होऊन आणखी रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

लसीकरण करण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकांची आरोग्य केंद्रात मोठ्याप्रमाणात गर्दी होताना आहे. त्यामुळेही दिसत आहे. संसर्गाचा धोका वाटत असल्याने पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी. तसेच दोन्ही आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. म्हणून रिक्त पदे त्वरित भरावी असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांनाही दिले आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇