एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने....!
शिरूर तालुक्यातील पाबळ मधील विद्यामान सरपंच मारुतीशेठ शेळके यांच्या "स्मशानभूमी स्वच्छता अभियानाला" उदंड प्रतिसाद
पाबळ ( सुनिल पिंगळे ) - एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने संत गाडगेबाबा यांच्या विचारांने प्रेरित होऊन शिरूर तालुक्यातील पाबळ गावाचे विद्यामान सरपंच मारुतीशेठ शेळके यांनी एक अभिनव उपक्रम राबवला व्हाट्सएपच्या माध्यमातुन एक मेसेज प्रेरित करुन पाबळामधील "स्मशानभूमी स्वच्छ" अभियान बद्दल आव्हान केले व या नाविन्यापुर्ण कामाला एका मेसेजेस मुळे उदंड प्रतिसाद मिळाला
पाबळ गावाचे प्रथम नागरिक सरपंच मारुतीशेठ शेळके यांनी काल व्हाट्सएपवर एक पोस्ट टाकली त्यामध्ये पाबळ मधील स्मशानभूमीत झालेले कचरा आणि इतर गोष्टी साठी सफाई करण्याकामी आव्हान केले, त्या आव्हानाला साथ देत सरपंच मारूतीशेठ शेळके यांच्या उपस्थिती उपसरपंच राजुशेठ वाघोले,माजी सरपंच सोपानराव जाधव,सदस्य सचिन वाबळे,हेमंत पिगंळे,आनिल जाधव, संदीप आगरकर, मा. ग्रा.पं सदस्य राजुशेठआगरकर,सपना जाधव, मिरान-हे,रोहिणी चव्हाण, अण्णासो. मोरे यांनी एकत्रित येऊन पाबळ मधील स्मशानभूमी साफ करण्याचं ठरवले आणि ते आज प्रत्यक्षित आणुन गावविकासासाठी एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने टाकले या कामी कचरा साफ सफाई करण्यासाठी गावातील सर्व सदस्य, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी यांनाही आव्हान केले होते या विनंतीला मान देत गावातील सर्व सदस्य यांनी एकत्रितपणे येऊन या उपक्रमात पक्ष,वादविवाद बाजुल ठेवुन सहभाग घेतला तर गावातील कोणत्या काम असु "आमचं कर्तव्य आहे" म्हणून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला तर पाबळ गावामधील हे स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याबद्दल कौतुक केले जातं आहे.
यावेळी सरपंच मारुतीशेठ शेळके यांनी केलेले आव्हानाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असुन एका चांगल्या कामासाठी गाव सहभाग नेहमी अग्रेसर असतो यांची पावती याठिकाणी मिळली आणि अस्वच्छ असलेले, झालेले स्मशानभूमी काही तासात सरपंच मारुतीशेठ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकसहभागातून स्वच्छ झालेले पाहण्यासाठी मिळाली संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान ख-या अर्थाने आज पाबळ मध्ये राबविण्यात आले तर संत गाडगेबाबा यांच्या विचाराशी प्रेरित होऊन सरपंच मारुती शेठ शेळके यांनी स्मशानभूमी नव्हे तर गाव स्वच्छता मोहीम टप्पा टप्याने करणार असल्याचे यावेळी सांगितले
एका व्हाट्सएपच्या मेसेज च्या माध्यमातून किती मोठं काम उभं राहु शकते यांची प्रचिती यावेळी दिसून आले उपस्थितीत सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजीमाजी सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व विशेषतः पाबळ गावाचे ग्रामस्थ यांचे आभार विद्यामान सरपंच मारुतीशेठ शेळके यांनी मानले व भविष्यात अशा पध्दतीने सहकार्य करण्याचं आव्हान सरपंच मारुतीशेठ शेळके यांनी केले आहे, तर या स्मशानभूमी स्वच्छता अभियानचं पाबळ परिसरातुन कौतुक होत आहे...आणि सरपंच व त्याच्या टिमचे ऋण व्यक्त केले जात आहेत.....!




