मंचर उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर लोकार्पण सोहळा संपन्न
प्रतिनिधी - स्वप्निल जाधव मंचर
मंचर उपजिल्हा रुग्णालयात गुरुवार दि.२०/५/२०२१ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १३ व्हेंटिलेटर बेडचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. हा लोकार्पण सोहळा कार्यक्रम शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी आंबेगाव च्या तहसीलदार रमा जोशी ,बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, प्रांतअधिकारी ,मंचर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अंबादास देवमाणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवण्याचे गरजेचे होते.या बाबत राज्याचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी तालुक्यातील दानशूर व्यक्तीं,सामाजिक संस्था यांना मदतीचे आवाहन केले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व दानशूर व्यक्तींनी पुढे येत एकूण १३ व्हेंटिलेटर बेड मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून दिले आहेत.
