अवैध दारू विक्री करणाऱ्या केंन्दुर या ठिकाणी छापा
देशी विदेशी एकुण 28 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
माहिती मिळले तर शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात अवैध दारु विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करु ....पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे
पाबळ प्रतिनिधी (सुनिल पिंगळे) शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार विभागात अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार असून या संबंधी लोकांनी पुढाकार घेत त्याठिकाणी असणार्या विविध धंद्यांची माहिती दिल्यास त्यावर ती कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या पाबळ पोलीस दूरक्षेत्र अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून देशी-विदेशी दारूची बॉटल जप्त करण्यात आले आहेत.
सहाय्यक फौजदार ए. एच. ढाकणे यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की केंदूर गावच्या हद्दीत थिटे मळा येथे पत्र्याच्या आडोशाला देशी-विदेशी दारुचा साठा बाळगून विक्री आपल्या ओळखीचे लोकांना करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लगेच ढेकणे यांनी प्रोविजन रेड कामी दोन पंचांना बोलावून घेऊन वरील बातमीचा असे पंचांना सांगून सदर ठिकाणी छापा घातले वेळी आपण पंच म्हणून सोबत हजर राहा असे पंचांना कळविले असता पंचांनी त्यास सहमती दर्शविली त्यानंतर पोलिस कर्मचारी व पंच असे मिळून बातमी च्या ठिकाणी खाजगी वाहनाने जाऊन पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव वैजनाथ ज्ञानोबा ढेंबरे वय 31 वर्षे थिटे मळा केंदुर तालुका शिरूर जिल्हा पुणे असे सांगितले
तर मिळलेले रेड मध्ये त्याच्याकडून खालील प्रमाणे वर्णन केलेल्या माल जप्त करण्यात आला आहे देशी विदेशी एकूण 28 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
यावेळीची कारवाई शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.एच.ढेकणे पोलीस कॉन्स्टेबल देशमुख होमगार्ड आर. जे. पिंगळे ए. बी. शिंदे यांनी यावेळी केले आहे तर शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार विभागात अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार असून या संबंधी लोकांनी पुढाकार घेत त्याठिकाणी असणार्या विविध धंद्यांची माहिती दिल्यास त्यावर ती कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी यावेळी सांगितले.
