पाबळ केंन्दुर जि.प. गटातील पत्रकार लसीकरण पासुन वंचित
पत्रकारांच्या लसीकरणास नियमांची आडकाठी!
लोकप्रतिनिधी व प्रशासन यांची दुटप्पी भुमिका
शिक्रापूर प्रतिनिधी (सुनिल पिंगळे) शिरूर तालुक्यातील पाबळ केंन्दुर जिल्हा परिषद गटातील पत्रकार जोखीम पत्करून काम करीत असताना त्यांच्या लसीकरणाबाबात प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखविला जात नाही. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यातील, तालुक्यातील,जिल्हा परिषद गटातील पत्रकारांचे दुसरे डोसही पूर्ण झालेत मात्र अजूनही पाबळ केन्दुर जिल्हा परिषद गटातील पत्रकारांसाठी नियमांची आडकाठी घातली जात आहे.
तालुक्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक घटक प्रयत्न करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील व गटातील डॉक्टर्स, नर्स, दवाखान्यातील सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. याशिवाय महसूल यंत्रणा, पोलिस प्रशासन, शिक्षकवर्ग यांचेही योगदान मोठे आहे. या घटकांसह प्रसार माध्यमांचे कामही दखल घेण्याइतपत आहेच. केन्दुर पाबळ जिल्हा परिषद गटातील पत्रकार कोरोना संसर्गाच्या संदर्भात जनजागृतीचे काम करीत आहेत वेळप्रसंगी कोरोना बाधित रग्णाला रग्णवाहिके मधुन नेऊन सुरक्षित कोविड सेंटर दवाखान्यात घेऊन जात आहे तर काही पत्रकार कोरोना बाधितांचा मुत्यू नंतर अंत्यविधी करत आहेत. कोरोना विषयक माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून केले जाते. दररोज शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शेकडो पत्रकार कोरोनाच्या लढ्यात तत्परता दाखवित आहेत. जोखीम पत्करून काम करीत असताना प्रशासनाला मात्र त्यांच्या कामाची दखल घ्यावीशी वाटलेली नाही. तर वयाची अट असल्याचे सांगत लसीकरणासाठी टाळाटाळ केली जात आहे.तर शिरूर तालुक्यातील इतर जिल्हा परिषद गटामध्ये दोन्ही डोस पूर्ण केलेले पत्रकार आहेत त्याठिकाणी असलेले लोकप्रतिनिधी यांनी तत्परतेने पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांचे लसीकरण करुन घेतले आहे तर जिल्ह्यात पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यासाठी विशेष मोहिम म्हणून लसीकरण मोहिम राबविलेले आहे विशेष म्हणजे त्यांचे लसीकरण मार्च महिन्यातच सुरू केले होते. यातील बहुतांश पत्रकारांनी दुसराही डोसही पूर्ण केला आहे. मात्र पाबळ केन्दुर जिल्हा परिषद गटातील पत्रकारांना व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अद्यापही लसीकरणाची मोहिम सुरु केलेले नसुन लसीकरणाचे फक्त गाजर दाखवले जात असल्याची तक्रार पत्रकारांना मधुन येतं आहे तर काही लक्ष्मीपुत्र मात्र कोरोना काळात कोरोना किट व इतर साहित्य वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकरांच्या मध्ये परस्पर वाटप करताना दिसुन येत आहेत पण पत्रकारांच्या लसीकरण बाबतीत मात्र त्याचीही उदसीनता दिसुन येत आहे.फ्रंटलाईन वर्कर्स, कोरोना योद्धे म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना लस दिली आहे. याशिवाय सध्या सर्व शाळा बंद असुनही तरीही शिक्षकांचे लसीकरण पूर्ण केले. या सर्वांचे लसीकरण ही बाब समर्थनीयच आहे. त्यांचे लसीकरण गरजेचेच होते. पण जिल्ह्यातील पर्यायाने या गटातील पत्रकारही कोरोना योद्धे, फ्रंटलाईन वर्क्स या नियमात बसू शकतात. असे असतानाही लोकप्रतिनिधी ची पत्रकरांच्या बाबतीत असलेले उदासीनता व प्रशासनाकडून पत्रकाराच्या लसीकरण मोहिमेस नियमांची आडकाठी असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून यासाठी वयाची अट घातल्याने पाबळ केन्दुर जिल्हा परिषद गटातील पत्रकार जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लसीकरणाची मोहिम सुरू करावी, अशी मागणी पत्रकार वर्गातून होत असुन जिल्ह्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांनाही लस देणे जरुरीचे आहे. पाबळ केंदुर जिल्हा परिषद गटातील या सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांची ही मागणी संबंधित प्रशासनाने ताबडतोब मान्य करावी अशी सुचना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जालिंदर आदक व मराठी पत्रकार संघटना जिल्हा उपध्यक्ष प्रशांत मैड यांनी दिली असुन लसीकरण बाबतीत या विभागातील पत्रकार हे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे
