Type Here to Get Search Results !

संतोष केदारी यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड.

संतोष केदारी यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड.

( पारनेर : प्रतिनिधी विनोद गायकवाड. ) पारनेर तालुका राष्ट्रीय काँग्रेस मागासवर्गिय सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी संतोष केदारी   यांची निवड.

पारनेर तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नविन कार्यकारीणीची निवड झालेल्या पदाधिका-यांना पारनेर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.संभाजी रोहकले सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रम हा निघोज ता. पारनेर जि.अहमदनगर येथे घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये सर्व नवनिर्वाचित सदस्य पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास   श्री.सुनिल(दादा)चौधरी व सेवा दल काँग्रेस कमेटिचे तालुकाध्यक्ष श्री.तांबे सर तसेच निघोज येथील काँग्रेस नेते लाळगे सर,काँग्रेस मागासवर्गिय सेलचे नवनिर्वाचीत अध्यक्ष मा. श्री .अक्षयराज(सोन्याभाऊ)गायकवाड यांनी नविन पदाधिका-यांचा शाल देवून सत्कार केला,नविन कमेटितील उपस्थित पदाधिकारी आयु.मिलिंद  सोनवणे,बाबाजी  सोनवणे,संतोष केदारी, मंगेश गरुड,संदेश गायकवाड, महेंद्र गायकवाड,भूषण गायकवाड, कवी संदीप राठोड सर व इतर मान्यवर उपस्थित होते शेवटि कमेटिचे तालुका सचिव यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी या सर्वांचे आभार मानले व सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .