माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांचा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
पुणे प्रतिनिधी : पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. सदानंदजी शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला असून सदानंदजी शेट्टी यांचे पक्षात सहर्ष स्वागत केले असून त्यांच्या प्रवेशाने शहरात पक्षाला बळ मिळाले असून येत्या काळात संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय करण्याच्या दिशेने जोमाने काम करू असा विश्वास यावेळी शहराध्यक्ष मा.प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते, माजी महापौर अंकुश काकडे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.