Type Here to Get Search Results !

शिक्रापूर - पाल्यांना मातृभाषेतूनच शिक्षण देण्याची गरज आहे

 पाल्यांना मातृभाषेतूनच शिक्षण देण्याची गरज आहे

 प्रतिनिधी (सुनिल पिंगळे शिक्रापूर) सध्या शिक्षण क्षेत्रात इंग्रजी माध्यमाकडे  पालकांचा ओढा अधिक आहे, हे वास्तव आहे, इंग्रजी माध्यमामुळे आपले पाल्य शैक्षणिक, बौद्धिक, वैचारीक दुष्टाने परिपक्व होतात, अशी पालकांची धारणा आहे पाल्याला कोणत्या पध्दतीचे शिक्षण द्यायचे हे सर्वाधिकार पालकांचा आहे पण खासगी शाळांपुढे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणपद्धती दुय्यम दर्जाचे असल्याचे पालकांचे मत अनाठायी आहे मुळात मुले शिक्षणापासून वंचित राहु नयेत यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.आर्थिकदृष्ट्या मागसलेल्या कुटुंबातील मुलांनाही शिक्षणासाठी अनेक बाबतीत सूट दिल्याने गोरगरिबांनाही शिक्षण घेणे सुकर झाले आहे तर माध्यान्ह भोजनासारखी योजना विद्यार्थ्यांची भूक भागवत आहे.

      मराठी माध्यमातून शिकवताना विद्यार्थी सर्वगुणसंपन्न करण्याबरोबरच आपली संस्कृती, समाजहिताचा विचार, देशहिताची भावना यांसारख्या अनेक बाह्य बाबींवरही महत्वपूर्ण कार्य करत असते.तर महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना शिकविताना केवळ 35 मिनिटांच्या बंधनात न अडकवता जोपर्यंत विद्यार्थ्यांना एखादा विषय लक्षात येईपर्यंत त्यांच्या शिक्षणाकडे शिक्षक जातीने लक्ष देतात, खासगी शाळांतील विद्यार्थी हा यंत्राप्रमाणे धावत असतो तर ध्येयापर्यंत कसे पोचायला पाहिजे हे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवलेले असते हि अतिशयोक्ती नाकारता येते नाही तर राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालातील सरासरी पाहिली तर आजही मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या अधिक आहे हेच विद्यार्थी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत मग पालकांचा इंग्रजी माध्यमासाठी हट्टचं का..? हा  तर संशोधन करण्याचा विषय आहे त्यामुळे पालकांनी खासगी शाळांच्या जाहिरातबाजीला न भूलत आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी व शिक्षणासाठी मराठी माध्यमाचाचं म्हणजे जिल्हा परिषद शाळाचा सर्वात आधी विचार केला पाहिजे हेही सत्य परिस्थिती नाकारता येणेजोगी नाही  अन्यथा नक्कीचं भविष्यात पश्चात्ताप

 करण्याची वेळ पालकांना वर  येणार आहे तर मुलांपेक्षा पालकांचा ओढ इंग्रजी माध्यमाकडे  जास्त आहे इंग्रजी जरी जगाची व्यवसायिक भाषा असली तरी मुलांना आपल्या मातृभाषेतून जर शिक्षण दिले तर.प्रत्येक गोष्टीची संकल्पना मुलांना स्पष्ट समजातील त्याच्या आवडी-निवडी लक्षात येतील आज विद्यार्थ्यांना आपले पारंपरिक सणवार महापुरुष, गड किल्ले,छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले अशा अनेक महान लोंकाची चरित्र इंग्रजी मध्ये समजणं शक्य होणार नाही तर संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज बहिणाबाईंच्या कविता पु.ल.देशपांडे यांचे लेखन वासुदेव भारुडे कसे उमगणार,विद्यार्थ्यांची मराठी भाषेचीप्रत्येक गोष्ट हि अगदी पाळण्यातूनच आईच्या अंगाईने सुरू होते आजी आजोबांच्या गप्पा गोष्टीतुन आकाशातील गंमती जमतीचं बरोबर जगाचे ज्ञान होते यासाठी मराठी भाषेतूनच ज्ञान प्राप्त होणं आवश्यक आहे आज मराठी माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतुन आपले लोकनेते महाराष्ट्र राज्याचे दैवत आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब इतकच काय आपल्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचेही शिक्षण मराठीमधुन होऊन आज त्या महाराष्ट्रच्या उच्च पदावर आहेत मग जरा मराठी भाषा सर्वगुणसंपन्न असताना इंग्रजी माध्यमाच अट्टाहास का असे मत कवी श्री.योगेश चव्हाण यांनी व्यक्त केले आहे