Type Here to Get Search Results !

सोनईतील प्रताप फुंदेचा दुबईतही डंका, केमीकल कंपनीत मॅनेजर म्हणून निवड. | C24TAAS |

सोनईतील प्रताप फुंदेचा दुबईतही डंका, केमीकल कंपनीत मॅनेजर म्हणून निवड. | C24TAAS |

नेवासा - सोनई येथील रहिवासी प्रताप हनुमंत फुंदे या युवकाने मराठी चित्रपटसृष्टीला रामराम करत नशिब आजमवण्यास दुबई गाठली आणि येथेही त्याने जिद्द,चिकाटी व हुशारीच्या जीवावर गावाचा झेंडा ऊंच फडकाविला आहे.दुबईतील नामांकित केमीकल थ्रीझोन कंपनीत त्याची केमीकल सेल्स अॅण्ड सप्लाय चेन व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे. 


प्रताप फुंदे हा पानसवाडी(ता.नेवासा) जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत फुंदे यांचा लहान मुलगा असुन त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सोनईतच झाले.पुण्यात मेकॅनिकल इंजिनियर पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांने कुठेही नोकरी न करता चित्रपट क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला.त्याने तीन शुन्य,लाईफ लाईन,कारे प्रोड्युसरा,द टाईम,तेज रफ्तार या शाॅर्ट फिल्म केल्या.यामध्ये बेस्ट एॅक्टरचा पुरस्कार मिळाल्यानंतर सजदा चित्रपटात हिरोची भुमिका केली.त्याने टीव्ही सिरियल व नाटकातही नाव कमावले.


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


चित्रपट क्षेत्रात यशाचे शिखर सर करत असतानाच त्यास दुबईतील एका नामांकित ऑईल कंपनीतून नोकरीसाठी काॅल आला.इंटरव्हयू मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने दुबई गाठली.आपल्या कर्तृत्वाने त्याने सर्वांना जिंकून घेतले.कंपनीने त्यास बढती देत कंपनीच्या केमीकल सेल्स अॅण्ड सप्लाय मॅनेजर पदावर विराजमान केले.पत्नी डाॅ.नूतन भाऊ डाॅ.रणजीत व भावजय डाॅ.गौरी सध्या कोरोना योद्धा म्हणून दिड वर्षापासून मुंबईच्या सेवेत कार्यरत आहेत.आई विजया व वडील फुंदे सरांनी पाठबळ दिल्यानेच हे यश प्राप्त झाल्याचे प्रतापने सांगितले.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇