नेवासा शहरात फॉग मशीन द्वारे फवारणी करावी - नगरसेविका सौ.मापारी.| C24Taas|
Telegram👇ग्रुप जॉईन करा..
https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG
( शंकर नाबदे ) नेवासा - सध्या पावसाचे दिवस सुरू असून ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने नेवासा शहरातील विविध भागात पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून ह्या डासांमुळे विविध रोगांना आमंत्रण मिळत आहे. तसेच सध्या चिकन गुणिया,डेंग्यू, मलेरिया या रोगांची साथ सुरू असून नेवासा शहरात काही प्रमाणात नागरिक आजारी पडले आहेत.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
तरी या नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने नगरपंचायत च्या वतीने नेवासा शहरात फॉग मशीन द्वारे फवारणी करून, बी.सी.पावडर फवारणी करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन नेवासा नगरपंचायत चे मुख्याधिकारी अंबादास गरकल यांना नगरसेविका सौ.सिमाताई राजेंद्र मापारी यांनी दिले आहे.
सध्या शहरात साथीच्या रोगांची साथ चालू असून नागरिकांनी ही आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे-सौ.सीमाताई राजेंद्र मापारी, नगरसेविका
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇



