Type Here to Get Search Results !

नेवासा - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे गणेशवाडी येथील विद्यालयात शालेय साहीत्य व माँस्क वाटप.| C24Taas|

 नेवासा - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे गणेशवाडी येथील विद्यालयात शालेय साहीत्य व माँस्क वाटप.| C24Taas|


( शंकर नाबदे ) नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे शिवचिदंबर माध्यमिक विद्यालयात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे वतीने शालेय साहीत्याचे वाटप करण्यात आले. कोरोना सारख्या महामारीच्या काळात अनेक मुलांचे पालकत्व हरवले तर कित्येकांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्या .संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डि .टि .आंबेगावे यांनी एका बैठकी दरम्यान कोरानाने पालकत्व हरवलेल्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व 

Telegram👇ग्रुप जॉईन करा..

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


गणवेश पुरविणे कामी विचार मांडले व त्याला संघटनेचे वतीने लगेचच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला .संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डि . टि .आंबेगावे व अहमदनगर जिल्हा वतीने अध्यक्ष सुभाष चिंधे यांचे मार्गदर्शनाखाली युवा अध्यक्ष गणेश बेल्हेकर यांनी या कामी पुढाकार घेत गणेशवाडी येथे शिवचिदंबर माध्यमिक विद्यालयात याची सुरुवात करत पालकत्व हरवलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले .त्याच प्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:


विद्यालयास सँनिटायझर व दिडशे माँस्क संघटनेचे पदाधिकारी यांचे हस्ते देण्यात आले .या पुढे ही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपले पालक या कोरोनाने गमावले त्या मुलांसाठी संघटना कायमस्वरूपी त्यांचे पाठीशी उभा राहणार असल्याचे संघटनेचे वतीने सांगण्यात आले .या वेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश बेल्हेकर ,संजय वाघ ,संतोष टेमक ,मोहनराव शेगर ,अशोकराव भुसारी विद्यालयाचे संस्थापक दत्तात्रय लोहकरे ,मुख्याध्यापक राजेंद्र लोहकरे ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .विद्यालयाच्या वतीने उपस्थित पत्रकारांचा सन्मान या वेळी करण्यात आला .

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇