Type Here to Get Search Results !

नेवासा व नेवासा फाटा येथील १२ दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल.| C24TAAS |

 

 नेवासा व नेवासा फाटा येथील १२ दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल.| C24TAAS |

शंकर नाबदे, नेवासा : नेवासा : कामीका एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेवासा व नेवासा फाटा बंदचा आदेश प्रशासनाने काढलेला असतांना मंगळवारी सायंकाळी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १२ व्यावसायिकांवर कारवाई करीत गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

     कामीका एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या वतीने मंगळवार दि.३ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते गुरुवार दि.५ ऑगस्ट सकाळ ८ पर्यन्त नेवासा शहर व नेवासा फाटा येथील दुकाने तसेच वाहतूक बंद ठेवण्याबाबतचा आदेश काढण्यात आला असताना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस निरीक्षक विजय करे,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पोलीस नाईक नितीन भाताने,प्रताप दहिफळे,अमोल साळवे हे 

श्री. विजय करे, पोलीस निरीक्षक


नेवासा शहर व नेवासा फाटा परिसरात गस्त घालत असतांना नेवासा शहरातील अल्ताफ पिंजारी,जिजाबापू जाधव(संदीप बेकर्स),मनोज पारखे(ओम हार्डवेअर),कैलास वाखुरे(मध्यमेश्वर केक शॉप ),ताराचंद परदेशी(श्रावणी पान स्टॉल ),रेणुका डांगरे (डांगरे बेंगल्स), गोरख घुले (राजहंस केक शॉप) तसेच नेवासा फाटा येथील रवींद्र उकिरडे( रवींद्र किराणा),भगवती गुजर(शिवशक्ती आइस्क्रीम),सोपान पंडित (ज्ञानेश्वर वडापाव),अल्ताफ कुरेशी (अन्वर चिकन शॉप व एजाज मटण शॉप),सोमनाथ खंडेलवाल (खंडेलवाल ट्रेड्स), हे दुकाने सुरू असतांना आढळून आले असून या व्यावसायिकांच्या विरोधात नेवासा पाेलिसांनी १८८,२६९,२७० आपत्ती व्यवस्थापन कायदा,साथ प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा नाेंदविला आहे.

    सदर व्यावसायिक शासन निर्देशाचे व नियमांचे वारंवार उल्लंघन करत असून ही दुकाने कोरोना काळात सील करण्यात याव्यात याबाबतचा अहवाल तहसीलदार यांना सादर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले.


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇