महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नेवासा तालुका प्रसिध्दी प्रमुखपदी पवन गरुड यांची निवड.| C24TAAS |
Shankar Nabadeऑगस्ट ०८, २०२१
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नेवासा तालुका प्रसिध्दी प्रमुखपदी पवन गरुड यांची निवड.| C24TAAS |
शंकर नाबदे, नेवासा :नेवासा फाटा विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुक्यातील सर्व सदस्यांची बैठक पार पडली यावेळी नेवासा फाटा येथील दैनिक प्रभातचे वार्ताहर पवन गरुड यांची नेवासा तालुका प्रसिध्दी प्रमुख पदी निवड सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी पत्रकारांच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर राहणार व पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचे प्रतिपादन गरुड यांनी केले.
निवडी बद्दल प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव,जिल्हा अध्यक्ष अनिल रहाणे,जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोनकर,जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे , नेवासा तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड,तसेच राजकीय, प्रशासकीय, अधिकारी, व सामाजिक कार्यकर्ते , यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध पत्रकार संघाचे अध्यक्ष व पत्रकारांनी यांनी अभिनंदन केले आहे.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group: