Type Here to Get Search Results !

समाजाला चांगली दिशा देण्याचे काम शिक्षक करतात -प्राचार्य.डॉ सुधाकर जाधवर शिक्षक गौरव समारंभात उदगार

समाजाला चांगली दिशा देण्याचे काम शिक्षक करतात -प्राचार्य.डॉ सुधाकर जाधवर शिक्षक गौरव समारंभात उदगार 

पुणे प्रतिनिधी: वारजे माळवाडी परिसरातील सर्व शिक्षक गुरुजनांचा शिक्षक दिनानिमित्त शिक्षक गौरव समारंभचे आयोजन विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगर सेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने करण्यात आले होते परिसरातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे कार्यक्रमाचे संयोजक विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर सुधाकर जाधवर बोलताना म्हणाले की जबाबदार समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा मानसन्मान करत असताना या शिक्षकांना पाठिंबा देणारे वातावरण आज तयार करणे गरजेचे बनले आहे. ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम शिक्षक करत असतात. म्हणूनच समाजाला चांगली दिशा देण्याचे काम जो करतो तो शिक्षक करत असतो पण मागील दहा वर्षात शिक्षकांना मानसन्मान देण्याची पद्धत कमी झाली. पण त्या आगोदरच्या काळात शिक्षकांकडे आदर भावनेने पाहिले जात होते. पूर्वी शिक्षक प्रेमा बरोबरच छडीच्या धाकावर मुलांना घडवत पण आता मुलांना हात लावला तरी पालक शाळेत येतात. त्यामुळे मुलांना घडवण्याचे साधनच शिक्षकांच्या हातातून काढून घेतले आहे. 

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप बोलताना म्हणाले की शिक्षकांनी जबाबदारी घेतली आहे म्हणून समाज आज जिवंत आहे. शिक्षक हे जबाबदार नागरिक देशासाठी घडवत असतात. आज ऑनलाईन शिक्षणाच्या काळात घरी मुलांना सांभाळणं किती आवघड आहे हे पालकांना कळले आहे, त्यामुळे मुलं सांभाळणं शिक्षकांनीच जाणो अस अनेक जन म्हणताना दिसत आहेत. मुलांवर मेहनत घेऊन त्यांना आदर्श नागरिक बनवणाऱ्या शिक्षकांना खरचं सॅल्यूट करावासा वाटतो. शिक्षकांचे तसेच विनाअनुदानित शिक्षकांचेही प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू

विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ प्रास्ताविक करताना म्हणाल्या की शिक्षक शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर आदर्श व्यक्तिमत्व उभे राहते. समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान कारण हे आमचं कर्तव्य आहे असं समजून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वी. दा. पिंगळे यांनी केले.