Type Here to Get Search Results !

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले हर्षवर्धन मानकर यांची सत्ताधारी भाजपवर टीका

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले हर्षवर्धन मानकर यांची सत्ताधारी भाजपवर टीका
पुणे प्रतिनिधी: गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर वाढले की सर्व वस्तूंची दरवाढ होते. एकीकडे सामान्य नागरिक कोरोना महामारीचा सामना करत आहेत तर दुसरीकडे मोदी सरकार दर सतत वाढवत असल्याने त्यांच्या उत्पन्नावर मर्यादा आलेली आहे.  हा फार मोठा अन्याय या देशातील जनता सहन करत आहे . ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे तो मध्यमवर्गीय फार मोठ्या संकटात सापडला असून शेतकऱ्यांनाही फार मोठा आर्थिक फटका पंतप्रधान मोदींनी दिला आहे.
      त्यासाठीच आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने कोथरूड मधील दशभुजा गणपती मंदिर, पौड  फाटा येथे मोदी सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा  दीपक  मानकर,  कार्याध्यक्ष नितीनजी कळमकर,  स्वप्निल दुधाने,  मिलिंद वालवडकर,  बंडू तांबे, सुषमा निम्हण, किशोर कांबळे , ज्योतीताई सूर्यवंशी, गोविंद थरकुडे, वैभव कोठुळे, शुभम माताळे, धनंजय  पायगुडे, सीताराम तोंडे- पाटील, संतोष मराठे,निलेश शिंदे, योगेश सुतार,मधुकर भगत, प्रमोद शिंदे,समीर उत्तेकर, नवनाथ खिलारे, संतोष चव्हाण, गिरीश गुरुनानी, स्वप्नील खोले,सचिन शेडगे, मंदार खरे, रोहिदास जोरी,बाळासाहेब मोकर,कैलास मकवान,सचिन जोरी, चंद्रकांत कुदळे,विष्णुपंत सरगर, राजाभाऊ गायकवाड,अज्जू शेख, श्रीकांत बालघरे, ऋषिकेश कडू, प्रमित गोरे, संजय लाड, सचिन माने, आरती गायकवाड, राखी श्रीराव,  सुषमा ताम्हणे, तृप्ती शिंदे, नंदिनी बडदे, ऋतुजा देशमुख,संगीता मोहोळ,त राजश्री मस्के,कीर्ती पानसरे,पूजा शेळके, मीना आठवले, उषा मरे, सुमिश्रा बहाद्दूर, रेखा नानेकर,आशा जमदाडे, सुनिता  खरात, सविता शिंदे, भूषण शिर्के,आशिष शिंदे,लखन सौदागर, विजय बाबर, ऋषिकेश डफळ, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनास उपस्थित होते.