अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा २१ गावात २३ ऑक्टोबर पर्यंत लॉकडाऊन जाहीर.| C24Taas|
Telegram👇ग्रुप जॉईन करा..
https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG
नेवासा ( शंकर नाबदे ) : अहमदनगर जिल्ह्यात दररोज नव्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढत होत असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा २१ गावात दि.१४ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केला आहे.
७ तालूक्यातील २१ गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक १४ ऑक्टोंबर पासून ते २३ ऑक्टोंबर च्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
सदरच्या क्षेत्रामध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल. तसेच सदर क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून कृषी माल व आवश्यक वस्तू वाहतूक वगळता इतर वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
अकोले - विरगाव, सुगाव बु., कळस बु.
कोपरगाव - टाकळी
नेवासा - चांदा
पारनेर - जमगाव, वासुंदे
संगमनेर - उंबरी, वेल्हाळे, चंदनापूरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमाला,मालदाड, सुकेवाडी, ओझर बु., जोर्वे
नगर - पिंपळगांव माळवी
श्रीगोंदा - लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ
वरील गावांचा समावेश आहे...
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

