दौंड-भिमथडी शिक्षण संस्थेच्या स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयात मंगळवार दिनांक ६ जून 2023 रोजी सकाळी ८ ते ११ वाजे पर्यंत शिव छत्रपतींच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संस्थेतील ३०० विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा त्यात काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा, संभाजी राजांची वेशभूषा व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून रॅली चे आयोजन करण्यात आली होते.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी चौक येथे पथनाट्यसादर केले त्यात छत्रपतीना जीं विशेषणे लावली जातात आणी जयजयकार होतो त्यांचा अर्थ जनसामान्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करून शिव छत्रपतींच्या जय जयकारा समवेत प्लास्टिक पुनर्वापर करणे व वृक्ष सावर्धनाच्या घोषणा देत हातात पोस्टर घेऊन परिसरातील वातावरण पर्यावरण पूरक संदेश प्रसारित करून वातावरण प्रफुल्लित करत दौंड शहरात प्रभात फेरी काढण्यात आली.
संस्थेचे चेअरमन माननीय विक्रम शेठ कटारिया यांच्या मार्गदरशनाखाली कार्यक्रमाचे नियोजन श्रीकृष्ण ननवरे सर ,वैभव पाटील सर यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक
प्रा नम्रता नाडगौडा,
प्रा.डॉ.शरद जगताप,
प्रा ज्ञानेशश्वर गाडेकर
प्रा डॉ विकास शेलार
प्रा सीमा ननवरे
प्रा जयश्री लोहगावकर
प्रा जितेंद्र देशमुख
प्रा डॉ.आबा मुळे व सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले.हि माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र यांनी दिली.
