संदिप कुसमूडे व रोहित पाटोळे या दोन्ही तरूणांनी घवघवीत यश मिळवले.
कुसमूडे याने सेट परीक्षेमध्ये यश संपादन केले तर पाटोळे याची पीएचडी साठी निवड.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील धामोरी येथील संदिप कुसमूडे याने सेट परीक्षेमध्ये राज्यशास्त्र विषयांमध्ये यश संपादन केले. तर वरवंडी येथील रोहित पाटोळे या तरूणाची पीएचडी साठी निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे तालूक्यातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
राहुरी तालूक्यातील धामोरी येथील रहिवाशी संदीप आप्पासाहेब कुसमुडे या तरूणाने मार्च २०२३ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेमध्ये राज्यशास्त्र विषयांमध्ये यश संपादन केले. त्याने लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी येथे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते.
मार्च २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये संदिप कुसमूडे याने २०२ गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. तो प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब कुसमुडे यांचे चिरंजीव आहे. तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिरुद्ध जाधव व प्रा. शिवाजी हुलुळे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
तसेच वरवंडी येथील रहिवासी रोहित पोपट पाटोळे या तरूणाची २०२२ मध्ये सावित्री बाई फुले विद्यापीठ मध्ये पीएचडी साठी निवड झाली आहे. त्याचे संशोधन क्षेत्र किरीट सोमय्या वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे आहे. त्याला प्राचार्य डॉ. विलास अवारी तसेच मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. अल्पना पंकज शर्मा व राहुरी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र प्रमुख डॉ. अनिरुद्ध जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
संदीप कुसमुडे व रोहित पाटोळे या दोन्ही तरूणांनी अथक परिश्रम घेऊन मिळवीलेले यश हे प्रशंसनीय आहे. त्यांच्या या यशाबद्दल आरपीआय चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविण लोखंडे, तालूकाध्यक्ष विलास साळवे, पत्रकार मनोज साळवे, मिनाष पटेकर तसेच लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र गोसावी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
तसेच लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी आणि तालूक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.

