Type Here to Get Search Results !

राहुरी - संतोष दांगट व त्यांच्या आईला शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण.

 संतोष दांगट व त्यांच्या आईला शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


रस्त्यावर पडलेले दगड केल्याचा राग आल्याने पाच जणांनी मिळून दोघा माय लेकाला शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण करण्यात आली हे घटना राहुरी तालुक्यातील कातराड येथे घडली.


संतोष अशोक दांगट, वय २५ वर्षे, हा तरूण राहुरी तालूक्यातील कात्रड येथे त्याच्या कुटुंबासह राहत असून नवनाथ बबन दांगट हा तेथेच राहणारा असून दोन्ही कुटुंबामध्ये शेती गट नं. ४३७ मध्ये जाणारे रस्त्यावरुन वाद आहे. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास संतोष दांगट हा नवनाथ बबन दांगट यांच्या घराच्या पाठीमागुन जाणारे रस्त्यातुन शेतात ट्रक्टर घेवुन जात होता. 


तेव्हा रस्त्यावर दगड आलेले होते. तेव्हा संतोष दांगट याने ट्रॅक्टर थांबवुन रस्त्यातले दगड बाजुला काढले. तेव्हा तेथे आरोपी आले व संतोष दांगट याला म्हणाले कि, तूला जास्त झाले काय, तू रस्त्यातले दगड कशाला काढतो. तेव्हा संतोष दांगट त्यांना म्हणाला की, ट्रॅक्टर जायला रोड नव्हता, म्हणून रस्त्यात आलेले दगड काढत आहे.


त्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी संतोष दांगट याला घाणघाण शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यावेळी संतोष दांगट याची आई सुशिला ह्या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करुन दुखापत केली.


त्यानंतर आरोपी म्हणाले की, तू येथुन जायचे नाही, जर तु या रस्त्याने गेलातर तुला जिवंत सोडणार नाही. अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. झालेल्या झटापटीमध्ये सुशीला यांच्या गळ्यातील पाऊण तोळ्याच्या सोन्याच्या पळ्या गहाळ झाल्या आहेत. 


घटनेनंतर संतोष अशोक दांगट याने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून आरोपी नवनाथ बबन दांगट, बबन अनाजी दांगट, लता बबन दांगट, अनुसया लोखंडे (पुर्ण नाव माहिती नाही), रोहिणी गोरक्षनाथ दांगट सर्व रा. कात्रड, ता. राहुरी.


या पाच जणांवर गुन्हा रजि. नं. ६९२/२०२३ भादंवि कलम ३२४, ४२७, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.