शेतकरी संघटनेच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारणी मागे घ्यावी. तसेच कांद्याला सरसकट ३ हजार रुपये प्रति किंटल हमीभाव जाहीर करावा. ३१ मार्च पर्यंत खरेदी केलेल्या कांद्याला ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देऊ केले पण ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. ते त्वरीत जमा करावे.
या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. या तीन मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलना बाबतचे निवेदन राहुरी येथील तहसीलदार चंद्रजित राजपुत यांना दिले. दिलेल्या निवेदनावर रवींद्र मोरे, सचिन गडगुळे, प्रकाश देठे, प्रमोद पवार, जुगल कुमार गोसावी, सचिन म्हसे, दत्तात्रय मोरे, रवींद्र निमसे, सतीश पवार, सुनील इंगळे, संदीप शिरसाठ, राहुल करपे, भरत वाम, सुनील इंगळे, प्रवीण पवार, प्रमोद पवार, अमोल पवार, भाऊसाहेब दिवे, अमोल दिवे, बाळासाहेब काळे, बापूसाहेब बाचकर, दिनेश वराळे, किशोर वराळे, अमित पर्वत आदींच्या सह्या आहेत.
सरकारच्या या आडमुठे धोरणामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट पसरली आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन रविंद्र मोरे यांनी केले आहे.
