शौचालयाला जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शौचालयाला जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीला पळवून नेल्याची घटना राहुरी तालूक्यातील खुडसरगांव परिसरात दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी घडलीय. याबाबत करण पवार याच्या विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेतील १७ वर्षे ४ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी राहुरी तालूक्यातील खुडसरगांव परिसरात तीच्या आई वडीलांसह राहते. दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २.३० वाजे दरम्यान ती अल्पवयीन मुलगी शौचालयाला जाऊन येते. असे सांगुन घरातुन बाहेर पडली.
बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नाही. तेव्हा तीच्या नातेवाईकांनी तीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती दिसून आली नाही. त्यानंतर आरोपी करण अशोक पवार, रा. खुडसरगांव, ता. राहुरी. याने त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे तीच्या नातेवाईकांना समजले.
त्यानंतर पिडित मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी करण अशोक पवार, रा. खुडसरगांव, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ८७६/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
