ग्रामीण रुग्णालय शहरा बाहेर नेण्यास आरपीआय चा कडाडून विरोध.
रुग्णालय आहे त्याच जागेवर व्हावे, अन्यथा आरपीआय च्या वतीने उपोषण- विलास साळवे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालय शहराच्या बाहेर नेण्याच्या हालचाली काही पुढाऱ्यांकडून सुरू आहेत. या प्रक्रियेला आरपीआय कडून तीव्र विरोध करण्यात येत असून या बाबत ६ नोव्हेंबर २०२३ पासून आमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे. याबाबत आज महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
आरपीआय चे तालूकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी तहसीलदार चंद्रजित राजपुत यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, शासन स्तरावर राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालय शहरा पासून ५ ते ६ कि. मी. दुर नेण्याचा शासनाचा व नेते मंडळींचा विचार आहे.
ग्रामीण रुग्णालयासाठी शहरात मुबलक व योग्य अशी जागा असुनही काही स्वार्थी नेते ग्रामीण रुग्णालय शहराच्या बाहेर नेण्याच्या विचारात दिसतात. रुग्णालय शहरा बाहेर गेल्यास गोर गरीब रुग्णांची हेळसांड होणार आहे.
त्यामुळे ग्रामीण रुग्णालय नवीपेठ येथे आहे त्याच जागी जागेवर व्हावे. अशी मागणी आरपीआय आठवले गटाच्या वतीने करण्यात आली. अन्यथा आरपीआय च्या वतीने ६ नोव्हेंबर २०२३ रोजी पासून आमरण उपोषण छेडण्यात येईल. असा इशारा निवेदनात देण्यात आलाय.
यावेळी आरपीआय तालूकाध्यक्ष विलास साळवे, राज्य उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष अनुसंगम शिंदे, तालूकाध्यक्ष सुनिल चांदणे, विवेक सगळगीळे, सागर साळवे, राजू दाभाडे, राजू बागुल, मयुर सुर्यवंशी, गणेश कोकाटे, अजिज इनामदार, रवींद्र शिरसाठ, दुर्गेश वाघ आदि उपस्थित होते.
