Type Here to Get Search Results !

राहुरी - घरासमोर पडवी टाकायची नाही या कारणावरुन लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण.

 घरासमोर पडवी टाकायची नाही या कारणावरुन लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


घरासमोर पडवी टाकायची नाही. या कारणावरुन प्रविण शेजवळ यांना लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील सात्रळ येथे घडलीय. या घटने बाबत सहा जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आलाय. 


प्रविण उत्तम शेजवळ, वय ५५ वर्षे हे राहुरी तालूक्यातील सात्रळ येथे राहत आहेत. त्यांच्या घराचे जवळ सुरेश सदाशिव काकडे हा त्याचे कुटंबासह राहतो. ते नेहमीच कशाचे तरी कारणा वरून त्रास देतात. दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास प्रविण शेजवळ हे त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे पडवीचे काम करीत होते. 


त्यावेळी तेथे आरोपी आले व म्हणाले की, तुम्ही या ठिकाणी पडवी टाकायची नाही. ती जागा आमची आहे. त्यावेळी प्रविण शेजवळ त्यांना म्हणाले की, ही जागा ग्रामपंचायतची असुन त्या ठिकाणी आम्ही धुणेभांडे धुण्यासाठी सावली करीत आहोत. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. 


तेव्हा आरोपींनी प्रविण शेजवळ व त्यांच्या आईला शिवीगाळ करत लाकडी दांडा व लाथाबुक्कांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर प्रविण उत्तम शेजवळ यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


त्यानूसार आरोपी सुरेश सदाशिव काकडे, किरण सुरेश काकडे, अजय सुरेश काकडे, अमर अशोक काकडे, स्वाती अमोल काकडे, सुनिता सुरेश काकडे सर्व रा. सात्रळ ता. राहुरी. या सहा जणांवर गून्हा रजि. नं. १२३०/२०२३ भादंवि १४३, १४७, ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आलाय.