तहसीलच्या आवारातून वाळूचा टेम्पो चोरुन नेताना पोलिस पथकाने भामट्यांना रंगेहाथ पकडले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
महसूल पथकाने कारवाई करून ताब्यात घेतलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून रात्रीच्या दरम्यान चोरुन नेत असताना दोन भामट्यांनी पोलिसांनी रंगेहाथ पकडलेले. ही घटना दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी घडलीय.
राहुरी येथील महसूल पथकाने दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री वाळू चोरुन नेत असलेल्या एका टेम्पोवर कारवाई करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावला होता. दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ४.१५ वाजे दरम्यान दोन भामटे सदर सदर २ लाख रुपयाचा टेम्पो ४ हजार रुपए किंमतीची वाळू असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल तहसीलच्या आवारातून चोरुन नेत होते.
त्यावेळी ड्युटीवर असलेले स. फौ. एकनाथ आव्हाड, पोना. सतीष आवारे, रोहीत पालवे, अंकुश भोसले व तहसिल कार्यालयातील शिपाई मच्छिंद्र नन्नवरे यांनी भामट्यांना रंगेहाथ पकडले. या घटने बाबत पोलिस नाईक गणेश रमेश लिपने यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपी करण शरद मनतोडे, वय २० वर्ष, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी, वैभव बाबासाहेब जाधव, वय १९ वर्ष, रा. आरडगांव, ता. राहुरी, काशिनाथ चव्हाण (पुर्ण नाव माहीती नाही) रा. तांदुळवाडी, ता. राहुरी व रविंद्र बर्डे (पुर्ण नाव माहीती नाही) रा. देसवंडी, ता. राहुरी. यांच्यावर गून्हा रजि. नं. १२३५/२०२३ भादंवि ३७९, १०९, ३४ प्रमाणे चोरीचा गून्हा दाखल करण्यात आलाय.
